Our Mentor Organisations
Our Core Principles
Illuminated by Maharaj-ji's timeless grace, we walk a path of purposeful service, bound by vision and steadfast dedication.
Mission
Vision
Objectives
Legacy
Serving Communities,
Transforming Lives
"Love everyone, serve everyone, remember God, tell the truth."
— Neem Karoli Baba (Maharaj-ji)
The Neem Karoli Baba Foundation is a registered non-profit inspired by the life and teachings of the revered saint Neem Karoli Baba (Maharaj-ji). Rooted in the values of selfless service and unconditional love, we work across North India to uplift communities through healthcare, education, and humanitarian aid.
"The best form of worship is service to mankind."
— Neem Karoli Baba (Maharaj-ji)
Numbers That Tell Our Story
Every number represents a life touched, a family served, a community uplifted.
"If you want to see the change, be the change."
Support Our CauseRecent Activities
Fostering positive and everlasting change — uplifting lives, one act of service at a time.
Tree plantation
Economic Sustainability: By transitioning toward horticulture, farmers are moving away from traditional rain-dependent crops to high-value fruit production, ensuring a more stable and robust annual income.
Climate Regulation: In a region frequently impacted by rising temperatures, these 1,000 trees will create a natural "micro-climate," providing much-needed shade and helping to cool the ambient air through transpiration.
Soil Conservation & Water Retention: The root systems of these species are vital for anchoring the soil, preventing erosion during the monsoon, and improving the earth's ability to absorb and retain groundwater—a precious resource in the dry Marathwada landscape.
1000 trees planted
To foster long-term agricultural prosperity in the drought-prone Marathwada region, a strategic plantation initiative has been launched in Kasar Shirshi village, Nilanga Taluka, Latur District. A diverse selection of premium saplings—including Kesar Mango, Sapota (Chiku), and Coconut—was meticulously sourced to transform the local landscape into a productive horticultural hub.
This project was designed with a focus on accelerated economic impact. The specific varieties were selected based on their growth cycles, ensuring that the majority of these saplings will reach maturity and begin yielding fruit within just three years of plantation.
By shifting from traditional seasonal crops to these high-value fruit-bearing trees, the initiative empowers local farmers to:
Establish Sustainable Revenue: Creating a reliable, year-round business model through the sale of high-demand fruits.
Enhance Land Value: Converting arid plots into lush, income-generating orchards.
Future-Proof Livelihoods: Utilizing resilient species that provide a steady harvest, ensuring financial security for the farming community for decades to come.
This thoughtful selection of saplings represents more than just a plantation; it is a foundational investment in the entrepreneurial growth and environmental resilience of Kasar Shirshi.
Thyroid profile Lipid profile testing
Thyroid profile Lipid profile testing
Events We Organise
Celebrations, programmes, and drives that bring communities together.
Event
Neem Karoli Baba Charitable Trust
Collaborating for a Greener, More Resilient Tomorrow!
On September 30, 2026, Dr. Rajendra Sonkawade, President of the Neem Karoli Baba Charitable Trust, Kolhapur, met with Sri Aditya Pundir (Director) and Sri Bhavesh Swami (Lead – Clean Energy Policy & Engagements) at The Climate Project Foundation (TCPF) in New Delhi—a meaningful connection made possible through the guidance of Sri Ganesh Satav, Senior Educational Officer – Green Campus Program.
The Climate Project Foundation is driving urgent climate action by equipping people with the tools to become future leaders, notably through its flagship Green Campus Program helping educational institutions build sustainable futures.
In our joint discussion, we explored avenues for the two trusts to collaborate on shared platforms. At Neem Karoli Baba Charitable Trust, Kolhapur, our ongoing social and climate awareness initiatives across schools and villages aim to uplift communities at the grassroots. Together, grassroots action and institutional sustainability can create lasting impact.
Delighted to share this snapshot from our visit to the TCPF office in New Delhi! 📸🌿
Event
Neem Karoli Baba Charitable Trust
A Memorable Day with Physics Legend Padma Shri Prof. H. C. Verma (9 July, 2026)
On July 9, 2026, Padma Shri Prof. H. C. Verma, Founder of the National Anveshika Network of India (NANI), addressed 12th-grade, UG, and PG physics students in Kolhapur.
This special interactive session was jointly organized by:
- IAPT (Kolhapur Chapter)
- Department of Physics, Shivaji University, Kolhapur
- Neem Karoli Baba Charitable Trust, Kolhapur
A heartfelt thank you to Prof. Verma for inspiring the next generation of scientific minds.
- The Department of Physics at Shivaji University, Kolhapur (SUK), Neem Karoli Baba Charitable Trust, Kolhapur, IAPT, Kolhapur Chapter, hosted an extraordinary academic event featuring the legendary physicist and author, Padma Shri Prof. H. C. Verma. The specialized guest lecture, titled "Quantum Physics and Physics as a Career: Opportunities in IISc, IITs, IISERs, TIFR, and International Physics Olympiad," drew a massive assembly of student scientists, researchers, and senior academic scholars.
The event commenced with a sustainable plant-watering ceremony, followed by an official introduction by Dr. M. V. Takale. In a moment of high institutional pride, Prof. R. K. Kamat, Hon’ble Vice-Chancellor of Shivaji University, formally felicitated Prof. Verma on behalf of the university community.
During his deep-dive 90-minute address, Prof. H. C. Verma seamlessly simplified complex quantum principles, transforming intimidating theories into intuitive, accessible models. Beyond foundational physics, he provided an explicit blueprint for ambitious students targeting research seats at India’s premier institutes, such as the Indian Institute of Science (IISc), Indian Institutes of Technology (IITs), Indian Institutes of Science Education and Research (IISERs), and Tata Institute of Fundamental Research (TIFR). He also outlined strategic preparation methods for global competitive benchmarking via the International Physics Olympiad.
The lecture transitioned into a high-energy, interactive Question-and-Answer session, allowing students to speak directly with the iconic educator. Scholarly perspectives and institutional support structures were highlighted in subsequent addresses by Prof. (Dr.) R. G. Sonkawade and Dr. V. N. Shinde, Registrar of SUK. The landmark event successfully concluded with an official vote of thanks presented by Dr. N. L. Tarwal.
Event
Neem Karoli Baba Charitable Trust
भौतिकशास्त्र विभाग आणि निम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्टचा संयुक्त उपक्रम; मूतखड्याची कारणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सविस्तर चर्चा
शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र विभाग आणि निम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी, २७ जुलै २०२६ रोजी बहुआयामी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 'युरिनरी स्टोन डिसीज आणि प्रतिबंधात्मक उपाय' या विषयावर आधारित या कार्यक्रमात केवळ वैद्यकीय ज्ञानावरच भर देण्यात आला नाही, तर भौतिकशास्त्राचे व्यावहारिक उपयोग आणि विद्यार्थ्यांचा औद्योगिक कौशल्य विकास यावरही सविस्तर मंथन झाले. या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. डॉ. एम. आर. वायकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि त्याचा मुख्य उद्देश उपस्थितांसमोर मांडला. तसेच भौतिकशास्त्र विभाग आणि निम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याविषयी विस्तृत माहिती दिली. यानंतर प्रा. (डॉ.) आर. जी. सोनकवडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे प्रा. (डॉ.) राजेंद्र बी. नेर्ली आणि सन्माननीय अतिथी श्री. अरुण आराध्ये यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कोल्हापूरच्या मेनन बेअरिंग्ज लि. आणि मेनन अल्कॉप लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अरुण आराध्ये यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी भारताच्या सध्याच्या डेमोग्राफिक डिव्हिडंडकडे लक्ष वेधताना सांगितले की, "आज भारताकडे जगात सर्वाधिक तरुण मनुष्यबळ आहे, ही अत्यंत जमेची बाजू आहे. मात्र, दुर्दैवाने आपल्याकडे कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे." केवळ चार भिंतींच्या आत मिळणारे पुस्तकी ज्ञान आताच्या स्पर्धेच्या युगात पुरेसे नाही, हे त्यांनी ठासून सांगितले. यावर उपाय म्हणून त्यांनी एक अत्यंत व्यावहारिक सूचना केली; शिवाजी विद्यापीठाने कोल्हापुरातील स्थानिक उद्योगांशी आणि कारखान्यांशी अधिक घट्ट टाय-अप करून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचाच एक भाग म्हणून प्रॅक्टिकल ट्रेनिंग बंधनकारक करावे, ज्यामुळे विद्यार्थी उद्योगांच्या थेट गरजा समजू शकतील.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगाशी जुळवून घेण्याचे आवाहन करताना श्री. आराध्ये यांनी 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स', 'सायबर सिक्युरिटी', 'डेटा सायन्स' आणि 'क्लाऊड कॉम्प्युटिंग' यांसारख्या विषयांचा अभ्यासक्रमात तातडीने अंतर्भाव करण्यावर भर दिला. केवळ तांत्रिक ज्ञानच नाही, तर विद्यार्थ्यांचे 'संवाद कौशल्य' देखील अत्यंत प्रभावी असायला हवे. शिकण्याची आणि स्वतःला अपडेट ठेवण्याची प्रक्रिया वयावर अवलंबून नसते, हे श्री. आराध्ये यांनी स्वतःच्या उदाहरणावरून सिद्ध केले. तरुणांनी आपला मौल्यवान वेळ फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाया घालवण्यापेक्षा तो वेळ नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि प्रॅक्टिकल ज्ञान मिळवण्यासाठी खर्च करावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. शेवटी त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सुप्रसिद्ध विचाराने आपल्या भाषणाचा समारोप केला: "स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत पाहता, तर स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपू देत नाही."
प्रा. (डॉ.) राजेंद्र बी. नेर्ली यांनी 'किडनी स्टोन' या अत्यंत वेदनादायी आणि गंभीर वैद्यकीय समस्येवर प्रकाश टाकला. आजकालच्या धकाधकीच्या आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे साधारण १० टक्के लोकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी या आजाराच्या मुख्य कारणांचे विश्लेषण करताना सांगितले की, दिवसभरात शरीराला आवश्यक तेवढे पाणी न पिणे, फास्ट फूड आणि इतर आहारातून मीठ व साखरेचे शरीरात जाणारे अतिरिक्त प्रमाण हे खडे तयार होण्यास कारणीभूत ठरते. याशिवाय, एक अत्यंत महत्त्वाची धोक्याची घंटा त्यांनी तरुणांसाठी वाजवली; ती म्हणजे जिममध्ये जाऊन शरीरसौष्ठव कमावण्यासाठी तरुण वर्गाकडून कोणतीही वैद्यकीय सल्ला न घेता मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाणारी 'प्रोटीन पावडर'. या पावडरच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंडावर ताण पडून स्टोन तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे.
किडनी स्टोनवरील उपचारांच्या इतिहासाचा आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा आढावा घेताना ते म्हणाले की, पूर्वी खडा काढण्यासाठी रुग्णाची मोठी ओपन सर्जरी करावी लागत असे, जी अत्यंत क्लेशदायक होती. मात्र, आता तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली असून कमीत कमी चीरफाड करणारे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामध्ये 'शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी' चा वापर सर्वाधिक केला जातो. या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा जन्म भौतिकशास्त्र आणि इतिहासाशी कसा जोडला गेला आहे, याचा एक अत्यंत रंजक किस्सा डॉ. नेर्ली यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.
प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना डॉ. नेर्ली यांनी संयमाने उत्तरे दिली. शॉकवेव्ह ऊर्जेचा वापर करताना इतर अवयवांना इजा होत नाही का? या प्रश्नावर ते म्हणाले की, हे तंत्रज्ञान अत्यंत सुरक्षित आहे. मानवी शरीरात किडनी ही पाठीमागच्या बाजूस स्थित असते. त्यामुळे पाठीमागून ध्वनी लहरींचा मारा करणे अधिक सोयीचे आणि सुरक्षित असते, ज्यामुळे इतर अंतर्गत अवयवांना कोणताही धोका पोहोचत नाही. मात्र, एकदा खडा फोडल्यानंतर त्याची पावडर जर शरीरातून पूर्णपणे बाहेर फेकली गेली नाही, तर त्याच कणांभोवती पुन्हा नवीन खडा तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिण्याच्या पाण्यासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, भारतात विहिरीचे पाणी पिणे सर्वसाधारणपणे सुरक्षित मानले जाते, परंतु आजकालच्या तरुणाईमध्ये 'एनर्जी ड्रिंक्स' पिण्याची जी क्रेझ वाढली आहे, त्यामुळे किडनी स्टोनचा धोका कित्येक पटींनी वाढू शकतो.
समारोप आणि आभार कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात प्रा. (डॉ.) आर. जी. सोनकवडे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी भौतिकशास्त्र, वैद्यकीय विज्ञान आणि औद्योगिक ज्ञान या तिन्ही भिन्न वाटणाऱ्या क्षेत्रांचा एकमेकांशी कसा घट्ट संबंध आहे आणि या कार्यक्रमातून तो कसा उत्तमरित्या उलगडला, याबद्दल समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या आंतरविद्याशाखीय व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या कक्षा रुंदावतात, असे ते म्हणाले.
शेवटी, डॉ. एम. व्ही. टाकळे यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. प्रमुख पाहुण्यांनी आपला मौल्यवान वेळ देऊन बहुमोल मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ आणि निम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रा. (डॉ.) राजेंद्र बी. नेर्ली यांचा सत्कार करताना प्रा. (डॉ.) आर. जी. सोनकवडे, सोबत श्री. अरुण आराध्ये
Event
Neem Karoli Baba Charitable Trust
Applications of Physics in Medical Sciences
The Department of Physics at Shivaji University, Kolhapur, played host to an inspiring and multifaceted popular talk by Dr. Veerdhawal Patil. Organized in association with the Neem Karoli Baba Charitable Trust, Kolhapur, the session brought together M.Sc. Physics students for a deep dive into an unconventional yet vital intersection: the synergy between advanced physics, holistic health, and financial well-being.
Event
Neem Karoli Baba Charitable Trust
Administration of HPV vaccine for Females
A Message From Our Leaders
Dedicated personalities striving to foster unity, compassion, and lasting change.
See Our Work in Action
Real moments, real lives changed — watch our programmes and drives on the ground.
जिल्हाधिकारी यांचे स्वागत Mega Health Checkup Camp Department of Physics
Welcome Function | NCC | जिल्हाधिकारी यांचे स्वागत Mega Health Checkup Camp Department of Physics
शिवाजी विद्यापीठात आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर संपन्न
कोल्हापूर येथील Shivaji University मध्ये आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
Health Checkup & Blood Donation Camp
Department of Physics Health Checkup Camp Blood Donation Camp Bagemedia1 Vlog
Prof. Dr. Suresh Gosavi Honourable Ag. Vice Chancellor Health Checkup Camp
Shivaji University Prof. Dr. Suresh Gosavi Honourable Ag. Vice Chancellor Health Checkup Camp
Building a Sustainable Lifeline
To combat the persistent water scarcity in the district, we have donated and installed:
High-Capacity Water Tanks: Strategically placed to provide a reliable source of hydration for cattle, which are central to the village's livelihood.
Extensive Pipeline Networks: A dedicated system of pipelines now delivers clean, accessible drinking water directly to pedestrians and the general public.
This initiative ensures that no one—human or animal—has to travel long distances in the heat to find water. By integrating this water project with our ongoing strategic plantation initiative, we are creating a flourishing, hydrated ecosystem in Kasar Shirshi. Today, the facility is buzzing with activity, serving as a daily hub for villagers and a sanctuary for the local cattle.
Featured In Media
News channels, TV, and online media coverage of our work
भौतिकशास्त्र विभाग आणि निम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्टचा संयुक्त उपक्रम; मूतखड्याची कारणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सविस्तर चर्चा
शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र विभाग आणि निम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी, २७ जुलै २०२६ रोजी बहुआयामी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 'युरिनरी स्टोन डिसीज आणि प्रतिबंधात्मक उपाय' या विषयावर आधारित या कार्यक्रमात केवळ वैद्यकीय ज्ञानावरच भर देण्यात आला नाही, तर भौतिकशास्त्राचे व्यावहारिक उपयोग आणि विद्यार्थ्यांचा औद्योगिक कौशल्य विकास यावरही सविस्तर मंथन झाले. या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. डॉ. एम. आर. वायकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि त्याचा मुख्य उद्देश उपस्थितांसमोर मांडला. तसेच भौतिकशास्त्र विभाग आणि निम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याविषयी विस्तृत माहिती दिली. यानंतर प्रा. (डॉ.) आर. जी. सोनकवडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे प्रा. (डॉ.) राजेंद्र बी. नेर्ली आणि सन्माननीय अतिथी श्री. अरुण आराध्ये यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कोल्हापूरच्या मेनन बेअरिंग्ज लि. आणि मेनन अल्कॉप लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अरुण आराध्ये यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी भारताच्या सध्याच्या डेमोग्राफिक डिव्हिडंडकडे लक्ष वेधताना सांगितले की, "आज भारताकडे जगात सर्वाधिक तरुण मनुष्यबळ आहे, ही अत्यंत जमेची बाजू आहे. मात्र, दुर्दैवाने आपल्याकडे कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे." केवळ चार भिंतींच्या आत मिळणारे पुस्तकी ज्ञान आताच्या स्पर्धेच्या युगात पुरेसे नाही, हे त्यांनी ठासून सांगितले. यावर उपाय म्हणून त्यांनी एक अत्यंत व्यावहारिक सूचना केली; शिवाजी विद्यापीठाने कोल्हापुरातील स्थानिक उद्योगांशी आणि कारखान्यांशी अधिक घट्ट टाय-अप करून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचाच एक भाग म्हणून प्रॅक्टिकल ट्रेनिंग बंधनकारक करावे, ज्यामुळे विद्यार्थी उद्योगांच्या थेट गरजा समजू शकतील.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगाशी जुळवून घेण्याचे आवाहन करताना श्री. आराध्ये यांनी 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स', 'सायबर सिक्युरिटी', 'डेटा सायन्स' आणि 'क्लाऊड कॉम्प्युटिंग' यांसारख्या विषयांचा अभ्यासक्रमात तातडीने अंतर्भाव करण्यावर भर दिला. केवळ तांत्रिक ज्ञानच नाही, तर विद्यार्थ्यांचे 'संवाद कौशल्य' देखील अत्यंत प्रभावी असायला हवे. शिकण्याची आणि स्वतःला अपडेट ठेवण्याची प्रक्रिया वयावर अवलंबून नसते, हे श्री. आराध्ये यांनी स्वतःच्या उदाहरणावरून सिद्ध केले. तरुणांनी आपला मौल्यवान वेळ फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाया घालवण्यापेक्षा तो वेळ नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि प्रॅक्टिकल ज्ञान मिळवण्यासाठी खर्च करावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. शेवटी त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सुप्रसिद्ध विचाराने आपल्या भाषणाचा समारोप केला: "स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत पाहता, तर स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपू देत नाही."
प्रा. (डॉ.) राजेंद्र बी. नेर्ली यांनी 'किडनी स्टोन' या अत्यंत वेदनादायी आणि गंभीर वैद्यकीय समस्येवर प्रकाश टाकला. आजकालच्या धकाधकीच्या आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे साधारण १० टक्के लोकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी या आजाराच्या मुख्य कारणांचे विश्लेषण करताना सांगितले की, दिवसभरात शरीराला आवश्यक तेवढे पाणी न पिणे, फास्ट फूड आणि इतर आहारातून मीठ व साखरेचे शरीरात जाणारे अतिरिक्त प्रमाण हे खडे तयार होण्यास कारणीभूत ठरते. याशिवाय, एक अत्यंत महत्त्वाची धोक्याची घंटा त्यांनी तरुणांसाठी वाजवली; ती म्हणजे जिममध्ये जाऊन शरीरसौष्ठव कमावण्यासाठी तरुण वर्गाकडून कोणतीही वैद्यकीय सल्ला न घेता मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाणारी 'प्रोटीन पावडर'. या पावडरच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंडावर ताण पडून स्टोन तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे.
किडनी स्टोनवरील उपचारांच्या इतिहासाचा आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा आढावा घेताना ते म्हणाले की, पूर्वी खडा काढण्यासाठी रुग्णाची मोठी ओपन सर्जरी करावी लागत असे, जी अत्यंत क्लेशदायक होती. मात्र, आता तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली असून कमीत कमी चीरफाड करणारे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामध्ये 'शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी' चा वापर सर्वाधिक केला जातो. या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा जन्म भौतिकशास्त्र आणि इतिहासाशी कसा जोडला गेला आहे, याचा एक अत्यंत रंजक किस्सा डॉ. नेर्ली यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.
प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना डॉ. नेर्ली यांनी संयमाने उत्तरे दिली. शॉकवेव्ह ऊर्जेचा वापर करताना इतर अवयवांना इजा होत नाही का? या प्रश्नावर ते म्हणाले की, हे तंत्रज्ञान अत्यंत सुरक्षित आहे. मानवी शरीरात किडनी ही पाठीमागच्या बाजूस स्थित असते. त्यामुळे पाठीमागून ध्वनी लहरींचा मारा करणे अधिक सोयीचे आणि सुरक्षित असते, ज्यामुळे इतर अंतर्गत अवयवांना कोणताही धोका पोहोचत नाही. मात्र, एकदा खडा फोडल्यानंतर त्याची पावडर जर शरीरातून पूर्णपणे बाहेर फेकली गेली नाही, तर त्याच कणांभोवती पुन्हा नवीन खडा तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिण्याच्या पाण्यासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, भारतात विहिरीचे पाणी पिणे सर्वसाधारणपणे सुरक्षित मानले जाते, परंतु आजकालच्या तरुणाईमध्ये 'एनर्जी ड्रिंक्स' पिण्याची जी क्रेझ वाढली आहे, त्यामुळे किडनी स्टोनचा धोका कित्येक पटींनी वाढू शकतो.
समारोप आणि आभार कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात प्रा. (डॉ.) आर. जी. सोनकवडे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी भौतिकशास्त्र, वैद्यकीय विज्ञान आणि औद्योगिक ज्ञान या तिन्ही भिन्न वाटणाऱ्या क्षेत्रांचा एकमेकांशी कसा घट्ट संबंध आहे आणि या कार्यक्रमातून तो कसा उत्तमरित्या उलगडला, याबद्दल समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या आंतरविद्याशाखीय व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या कक्षा रुंदावतात, असे ते म्हणाले.
शेवटी, डॉ. एम. व्ही. टाकळे यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. प्रमुख पाहुण्यांनी आपला मौल्यवान वेळ देऊन बहुमोल मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ आणि निम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रा. (डॉ.) राजेंद्र बी. नेर्ली यांचा सत्कार करताना प्रा. (डॉ.) आर. जी. सोनकवडे, सोबत श्री. अरुण आराध्ये
"पंचगंगा प्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनासाठी प्रशासनाला तरुण संशोधकांची साथ हवी" – कोल्हापूर जि.प. सीईओ डॉ. जस्मिन
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात नुकताच एम. एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयएएस अधिकारी डॉ. जस्मिन, तसेच सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजचे डॉ. सुनील कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर, एम.एस्सी. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी श्रेयश शिउडकर आणि प्रथम वर्षाची विद्यार्थिनी सुवर्णा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुनील कुलकर्णी यांनी संशोधनाचे महत्त्व विषद केले. त्यांनी मेरी क्युरी यांचे प्रेरणादायी उदाहरण दिले; ज्यांनी तत्कालीन समाजाचा विरोध पत्करून संशोधन केले आणि स्वतः शोधलेल्या मूलद्रव्याला अमेरिकेत आश्रय घेऊनही स्वतःच्या देशाच्या (पोलंडच्या) सन्मानार्थ 'पोलोनियम' असे नाव दिले. डॉ. आशुतोष कोतवाल आणि रेडिओ टेलिस्कोपचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कार्ल जानस्की यांची उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांना जग बदलणारी उपकरणे आणि समीकरणे तयार करण्याचे आव्हान दिले. "पदव्युत्तर शिक्षण ही खऱ्या अर्थाने शिक्षणाची सुरुवात असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी दर आठवड्याला किमान एक रिसर्च पेपर वाचून त्याच्या नोट्स काढाव्यात," असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. तसेच डॉ. अनिल काकोडकर यांच्या कार्याचा गौरव करताना, त्यांच्यामुळेच भारताला स्वस्त आणि सुरक्षित अणुऊर्जा मिळणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुण्या डॉ. जस्मिन यांनी आपल्या भाषणात विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींपासून दूर राहून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचा आग्रह धरला. विज्ञानाच्या तत्त्वांचा वापर करताना समाजाप्रती संवेदनशीलता असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचे प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, आणि अयोग्य शेती पद्धतीमुळे उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला विद्यापीठातील तुमच्यासारख्या तरुण संशोधकांच्या सहकार्याची नितांत गरज आहे," असे आवाहन त्यांनी केले. यूपीएससी परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन करताना डॉ. जस्मिन म्हणाल्या की, "सीसॅटसाठी दहावीपर्यंतचे गणित आणि संकल्पना समजून घेणे, उत्तर लेखनामध्ये प्रश्नाची अचूक मागणी ओळखणे आणि अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा एकाच पुस्तकाची उजळणी व स्वतःच्या विश्लेषणात्मक नोट्स काढणे यशासाठी महत्त्वाचे आहे." केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता ग्रामीण भागातील समस्या ओळखून नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स आणि उद्योजकता सुरू करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पुढे त्यांनी जिल्हा परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन, महिला आरोग्य, पाणी प्रदूषण, आशा वर्कर यांसारख्या राबवण्यात येणाऱ्या शासकीय सामाजिक उपक्रमांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. जस्मिन यांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला आणि विद्यार्थ्यांना प्राधान्य दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. "विद्यार्थ्यांनी केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे, तर इतर आर्थिक क्षेत्रांमध्येही करिअरच्या संधी शोधाव्यात आणि आपला दृष्टिकोन व्यापक ठेवावा," असे ते म्हणाले. निम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट आणि विभागाच्या माध्यमातून रंकाळा प्रदूषण आणि जल व्यवस्थापनासारख्या सामाजिक प्रश्नांवर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.
प्रास्ताविक भाषणामध्ये विभागाची यशोगाथा आणि वाटचाल उपस्थितांसमोर मांडण्यात आली. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने पीआयएफसी सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत १५,००० पेक्षा जास्त सॅम्पल्स स्कॅन करून विद्यापीठाला लक्षणीय महसूल मिळवून दिला आहे. विद्यापीठाच्या एकूण ६,५०० पब्लिकेशन्सपैकी ३,००० पब्लिकेशन्स भौतिकशास्त्र विभागाचे असून, त्यांना १ लाखापेक्षा जास्त सायटेशन्स मिळणे ही विद्यापीठासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या विभागाला विविध फंडिंग एजन्सीजकडून २० कोटी रुपयांचे महत्त्वपूर्ण प्रकल्प मिळाले असून, भाभा अणुसंशोधन केंद्राला तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याचे मोठे कामही विभागाने केले आहे. गॅस सेन्सर, सोलर सेल, पाणी शुद्धीकरण, आणि सुपर कॅपॅसिटर या अत्याधुनिक क्षेत्रांत येथे महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे. याशिवाय, विभागाचे १५० पेक्षा जास्त विद्यार्थी दक्षिण कोरिया आणि इतर देशांत संशोधनासाठी गेले असून ते विभागाचे 'रिसर्च अम्बेसिडर्स' म्हणून काम करत आहेत असे प्रा. (डॉ.) केशव राजपुरे यांनी सांगितले.
यानंतर एम.एस्सी. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी ऋतुजा निंबाळकर हिने शास्त्रीय नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. एम. एस्सी. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी प्रमोद कोराणे याने आभार मानले आणि या शानदार स्वागत समारंभाची सांगता झाली.
News Article
झेडपीच्या नव्या सीईओंचा सोनकवडे दाम्पत्याकडून सत्कार
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नव्याने नियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. जास्मिन यांचा नीम करोलि बाबा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सत्कार करण्यात आला.
या वेळी शीतल सोनकवडे व प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. जास्मिन या कुशल प्रशासक असून त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या कामकाजात सकारात्मक बदल होऊन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
🤝 सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले असून, ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
News Article
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांचा सत्कार
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नव्याने नियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांचा नीम करोलि बाबा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी ट्रस्टच्या वतीने शीतल सोनकवडे व प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
डॉ. जॅस्मिन या गतिमान व कर्तव्यदक्ष अधिकारी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या कामकाजात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
🤝 सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांच्या सहभागामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
News Article
Reduce Screen Time and Focus on Health
On March 25, 2026, Shivaji University in Kolhapur hosted a free health check-up and blood donation camp organized by the Physics Department, CPR Hospital, and the Neem Karoli Baba Charitable Trust. During the event, District Collector Amol Yedge urged students to reduce their screen time and limit mobile phone use to prioritize their health and academic focus. The initiative was a success, with 154 people receiving general check-ups, 46 undergoing ECGs, and 45 individuals donating blood to the CPR blood bank. Specialist doctors provided free consultations in fields such as pediatrics, dentistry, and ophthalmology to support the well-being of the university's students and staff.
Every Rupee
Transforms a Life
Feed the hungry. Educate a child. Support a patient.
Tax-exempt under 80G — every donation counts.
Lives Impacted
Children Educated
Medical Camps
Partner Organisations